पांगरी (गणेश गोडसे)  मतदान केंद्रात दोन गटात भांडणे होऊन त्यात मतदान यंत्राची मोडतोड करून नुकसान केल्याप्रकरणी खडकोणी ता.बार्शी येथील पंधरा जणांवर गैरवर्तन केल्याप्रकरणी पांगरी पोलिसात रविवारी (दि.1)रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी  पोलिसांनी धरपकड करत सर्व  आरोपींना अटक केली
     बाळासाहेब बापू नलावडे,सोमनाथ बापू नलावडे,योगेश सोमनाथ नलावडे,रघुनाथ विश्वनाथ कोथिंबरे,कालिदास रामलिंग आघाव,उमेश ईश्वर शिंदे,रामदास बापू नलावडे,महेश श्रीमंत नलावडे,महादेव नारायण नलावडे,गोकुळदास सुखदेव नलावडे,सतीश रामलिंग नलावडे,मारुती साहेबराव कोथिंबरे,सतीश बबन कोथिंबरे,अंकुश किसन गव्हाने,मनीषा अंकुश गव्हाने सर्व रा.खडकोणी अशी मतदान यंत्राची  तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नांवे आहेत.
  वैभव उत्रेश्वर बेणे रा.शुभाष नगर,बार्शी यांनी पांगरी पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे.गैरकायद्याची मंडळी जमवून मतदान केंद्रात येऊन आपापसात भांडणे करून त्या झटपटीत मतदान केंद्रातील दहा हजार रुपये किमतीच्या कंट्रोल युनिट यंत्राची मोडतोड केली.तसेच मतदान केंद्र स्थळी शांतता ठेवण्याच्या आदेशाचा भंग करून न ऐकता गैर वर्तन केले.असे फिर्यादीत म्हटले आहे.पांगरी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास स.पो.नि.सोमनाथ वाघ हे करत आहेत.
  पांगरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 35 गांवात ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडली मात्र खडकोणी येथील मतदान यंत्र फोडण्याच्या प्रकाराने याला गालबोट लागले.

 
Top