उस्मानाबाद - जिल्हृयात इंदिरा आवास योजना अतंर्गत 2015-16 या वर्षामध्ये तालुका निहाय घरकुल मंजूर करण्यात आलेली आहेत. उस्मानाबाद-139,तुळजापूर -65,उमरगा -150,लोहारा-14,कळंब-145,वाशी-40,भूम -140,परंडा-132 अशी एकूण 825 घरकुलांचे कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असल्याची माहिती प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,उस्मानाबाद यांनी दिली आहे.
सदरच्या याद्या www.osmanabad.nic,in वर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता घरकुलांची कामे सहा महिन्यात पुर्ण करणे आवश्यक आहे. घरकुल लाभधारकांना मंजूर घरकुलांची कामे तातडीने सुरू करून पूर्ण करण्यात यावीत. जिल्हृयातील सर्व प्रथम घरकुलांची कामे पूर्ण करणाऱ्या लाभधारकांचा, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा मार्फत सत्कार करण्यात येणार आहे. घरकुलांची कामे तातडीने सुरू करणे सुलभ व्हावे या दृष्टीने तालुकास्तरावर 5,6 व 7 नोव्हेंबर रोजी विशेष मोहिमेचे नियोजन यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे. या मोहिमेद्वारे घरकुल बांधकामासाठी आवश्यक करारनामे करणे,ऑनलाईन मंजूरी घेणे व बांधाकामाचे रेखांकन करणे इत्यादी कामे पार पाडण्यात येणार आहेत. या मोहिमेचा संबंधित लाभधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी ए.ई.रायते व प्रकल्प संचालीका रूपाली सातपुते यांनी संयुक्त एका पत्रकाद्वारे केले आहे.