
यावेळी रघुनाथ पाटील यांनी स्वाभिमानीला रोखण्यासाठी व शेतक-यांच्या प्रश्नांनां करिता सरकारच्या विरोधात लढण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनांशी हातमिळवणी केली. केंद्रशासनाच्या चुकीच्या परदेशी आयात धोरणांविरोधात १२ डिसेंबर रोजी राज्यात सेना-भाजप खासदारांच्या घरांवर मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच केंद्रशासनाने घेतलेल्या ७ वा वेतन आयोग कशाप्रकारे शेतकर्यांवर अन्यायकारक आहे यासाठी समांतर वेतन आयोग स्थापन करुन केंद्र सरकारला ३ महिन्यात सादर करणार असून १५ ते १७ जानेवारी दरम्यान शिर्डी येथे राष्ट्रीय महाअधिवेशन भरण्यात येणार असल्याचे रघुनाथ पाटील यांनी सांगितले.