तुळजापूर :- तुळजापूर तालुक्यातील सरडेवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दि. 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी ग्रामस्थाबरोबरच माता-पालक संघातील महिलाही उपस्थित होत्या. सुरुवातीस शाळेतील सहशिक्षक अशोक खडके यांनी संविधान विषयी माहिती सांगून संविधानाचे वाचन केले. संविधान जागृतीसाठी गावातून प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या.