तुळजापूर :- वडाचा तांडा (ता. तुळजापूर) येथील जिल्‍हा परिषदेस संविधान दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्‍यात आला. यानिमित्‍ताने गावातून प्रभातभेरी काढण्‍यात आली होती. यावेळी शाळेस ग्रामपंचायतीच्‍यावतीने संविधान भेट देण्‍यात आले. यावेळी  सरपंच शिवराम राठोड,, उपसरपंच लखन चव्हाण, आनंदा राठोड, वसंत चव्हाण, सूरेश राठोडख्‍ बळीराम जाधव, गूलाब राठोड यांच्‍यासह शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्‍थ उपस्थित होते. सूञसंचालन क्षिरसागर सर यांनी केले आभार वसंत चव्हाण यांनी मानले.
 
Top