उस्‍मानाबाद -: ६६ वा भारतीय संविधान दिन उस्मानाबाद जिल्ह्यात विविध कार्याक्रमानी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संविधान फौंडेशनच्या वतीने आज सकाळी उस्मानाबाद शहरातील जिजाऊ चौकातून संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत शहरातील सामाजिक संघटना आणि शाळा महाविद्यालयातील विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे आणि जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी या ठिकाणी उपस्थित राहून रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर हि रॅली संविधानाचा जयघोष करत शहरातील मुख्य रस्त्यावरून फिरत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पोहचली अभिवादनानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांच्या उपस्थितीत सामुदायिक भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी आनंद रायते, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी बी एन उबाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, शिवसेना जिल्हा प्रमुख सुधीर पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदार, रविंद्र केसकर, शिवराज्याभिषेक समितीचे विष्णू इंगळे, आदीजण सहभागी झाले होते. ही रेली यशस्वी करण्यासाठी संविधान फौंडेशनचे सुजित ओव्हाळ, रमाकांत गायकवाड, किशोर गवळी, हुंकार बनसोडे यांनी परिश्रम घेतले.
 
Top