उस्मानाबाद -: क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी,उस्मानाबाद यांच्या वतीने आयोजित राजीव गांधी खेल अभियानातंर्गत राज्यस्तरीय महिला मैदानी क्रीडा स्पर्धाचे येथील तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम,उस्मानाबाद येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते आज उदघाटन करण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, उस्मानाबाद जिल्हा अॅथेलेटिक्स संजय बदोले, निवड समिती सदस्य गणेश पवार, श्रीमती सीमा पाटील, शिवकांता देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक बनसोडे, मोहन पाटील, अंबादास दानवे यांच्यासह 9 विभागातील 198 खेळाडू व प्रशिक्षक यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
यावेळी उदघाटनपर भाषणात डॉ.नारनवरे म्हणाले की, महिला खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. ही कौतूकास्पद बाब आहे. खेळाच्या बाबतीत महिलाही मागे नाहीत. हे महिलांनी दाखवून दिले आहे. सर्व खेळाडूंनी खेळाडू वृत्तीचे दर्शन घडवून आपला जिल्हा राज्यात व देशात पुढे नेहण्यासाठी अथक परिश्रम करुन जिल्हयाचे नाव आंतराष्टीय स्तरावर घेऊन जाण्यासाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. तर श्री. त्रिमुखे म्हणाले की, प्रत्येक खेळाडूंने मन लावून खेळून प्राविण्य मिळवावे.
या राज्यस्तरीय महिला स्पर्धेत अमरावती,नागपूर, पुणे, मुंबई, कोल्हापूर, लातूर, नाशिक, औरंगाबाद आणि क्रीडा प्रबोधनी,पुणे यांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये धावणे, गोळा फेक,थाळी फेक, उंच उडी आदि मैदानी क्रीडा स्पर्धे होणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक बनसोडे यांनी करुन या महिला स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करुन यासंबंधी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पवार यांनी केले.
प्रारंभी आंतरराष्ट्रीय खेळाडू कुमारी अर्चना आढावा यांनी सर्व खेळाडूंना शपथ दिली.