उस्मानाबाद :- जिल्हृयातील सन 2015-16 या वर्षाचे इयत्ता 11 वी 12 वी च्या विद्यार्थ्याचे अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयाचे -/कनिष्ठ महाविद्यालयाचे ई.बी.सी तपासणी फॉर्म कॅम्पद्वारे आयोजित करण्यात येत आहेत. दि.23 नोव्हेंबर- लेखाधिकारी शिक्षण कार्यालय, उस्मानाबाद, 24 नोंव्हेंबर म.वि. रा.शिंदे हायस्कूल, तुळजापूर, 26 नोव्हेंबर भारत विद्यालय,उमरगा. (लोहारा/उमरगासाठी), 27नोव्हेबर- शि.म.ज्ञा.मोहेकर महाविद्यालय,कळंब, 2 डिसेंबर- एस. पी कॉलेज भूम (भूम /वाशीसाठी), 3 डिसेंबर- शि.म.रा. शिंदे,महाविद्यालय, परंडा
ई.बी.सी तपासणी करीता शिक्षण उपसंचालक,लातूर विभाग,लातूर यांनी दिलेली सन 2015-16 च्या संच मान्यतेची छायांकीत झेरॉक्स प्रत, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी सन 2015-16 मध्ये केलेल्या पटपडताळणी अहवालाची प्रत, युडायसच्या माहितीची सत्यप्रत, विहित नमुन्यातील प्रस्ताव, विद्यार्थ्याच्या प्रस्तावासोबत सक्षम अधिकारी यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्रासह प्रस्ताव वेळापत्रकामध्ये दिलेल्या तारखेस कॅम्पच्या स्थळी उपस्थित राहून प्रस्तावाची तपासणी करून घ्यावी, असे लेखाधिकारी (शिक्षण) यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.