पांगरी (गणेश गोडसे) :- पांगरी भागाला लागलेले शेतकरी आत्महत्याचे लोन कांही केल्या थांबण्यास तयार नसून सततचा दुष्काळ,नापिकी व पाण्याचे दुर्भिष्य याला कंटाळून एका शेतकर्याने राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दि.16 सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कारी ता.बार्शी येथे घडली.
पांडुरंग अर्जुन शिंदे वय 60 असे साडीने गळफास लावून घेऊन स्वत: आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नांव आहे.कुमार शिवाजी शिंदे याबाबतची खबर पांगरी पोलिसात दिली आहे.आत्महत्याग्रस्त पांडुरंग शिंदे यांचे सोयाबीन पीक पूर्णता: वाया गेले होते.त्यातून त्यांना उत्पन्न तर सोडाच पण झालेला साधा खर्चही निघाला नव्हता.त्यामुळे अलीकडील काही दिवसापासून निराश होते.काही दिवसापूर्वी त्यांनी पेरलेली ज्वारी पिकाची उगवणही झालेली नाही.कर्जाचा डोंगर वाढत असल्यामुळे कुटुंब चालवताना त्यांना पैशाची चणचण भासत होती.घर खर्च कसा चालवायचा या विवंचनेत असल्यामुळे त्यांनी अखेर काल राहत्या घरी गळफास लावून घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
मयत शिंदे यांना तिन एकर शेती होती.त्यांच्या पश्चात दोन मुली,एक मुलगा,पत्नी असा परिवार आहे.पांगरी पोलिसात अकस्मात मयत म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास हवालदार धननापा शेटे करत आहेत.