उस्मानाबाद :- जिल्हृयातील ग्रामपंचायतीचा माहे जानेवारी ते एप्रील 2016 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व पोटनिवडणूकीचे मतदान शनिवार, दि.19 डिसेंबर रोजी सार्वत्रिक दोन व पोटनिवडणूक सहा अशा एकूण आठ ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील-कौडगाव बावी व सांजा,तुळजापूर तालुक्यातील-किलज,लोहारा तालुक्यातील-चिंचोली रेबे, खेड व होळी,कळंब तालूक्यातील-लोहटा पुर्व,वाशी तालुक्यातील-सोनारवाडी या ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. येथील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, या क्षेत्रापुरती स्थनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.