पांगरी (गणेश गोडसे) :- अनेक प्रश्न, समस्या, ग्रांम पंचायतीच्या निवडणुका, ऊस दराचे व ऊसाच्या बिलासाठी झालेले आंदोलन शेतक-यांच्या पाचविला पुजलेला दुष्काळ, शासनाने आणेवारीचे कारण पुढे करत वगळलेला तालुका, सरकारकडे मोठया आशेने पाहणारा शेतकरी, आश्वासनांची खैरात तशिच पाठिमागे ठेवत सरते वर्षे सरत चालले आहे.
1972 च्या भिषण दुष्काळाची किंबहुना त्याहीपेक्षा भयावह परितस्थतीचा सामना गतवर्षी शेतक.यांसह सर्वसामान्य नागरिकांना करावा लागला.तशिच परिस्थिती उदभवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे लातुर राज्य मार्गाचे रूंदीकरण विकासकांमांचा अडकलेला रथ सर्वसामान्यांच्या समाधानासाठी व नेत्यांनी त्यांच्या मनोरंजनासाठी केलेल्या फुसक्या घोषणा रोजगाराच्या शोधार्त भटकत असलेला व दिशाहीन होत असलेला तरूण यासह अणेक प्रश्न तसेच मागे ठेऊन 2015 हे वर्षे जनतेला हुल देऊन गुड बाय म्हणत आहे.
या भागाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय ठरणारा टेंभुर्णी ते येडशी या 90 किलो मीटर अंतराच्या रूंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ कधी होणार अशी स्थिती असतानाच नुकतेच या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाल्यामुळे पुढे काय होणार हा प्रश्न पडला आहे. डिसेंबर उलटुन जाऊ लागला असला तरीही अदयाप अजुन शुभारंभाचा श्रीफळ वाढवलेला दिसत नाही.रस्ता रूंदीकरनानंतर या मार्गावरील अणेक शुक्षिक्षीत तरूणांना विविध माध्यमातुन रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध होऊन अणेकांचा रोजीरोटीचा प्रश्न मिटनार आहे.अणेक शेतकरी प्लॉट मालक कधी एकदाचे काम सुरू होऊन रस्ता कुठपर्यंत येर्इल याच्या विवंचनेत आहेत.रस्ता पुर्ण झाल्यांनतर बांधकामाचे बघु असे म्हणुन अणेकांनी आपली राज्यमार्गालगतची बांधकामेच थांबवलेली आहेत.मात्र पाच सहा वर्षांपासुन प्रलंबित असलेला रूंदीकरणाचा प्रश्न आनखी किती दिवस रखडणार असा सवाल विचारला जात आहे.या मार्गाचे बि.ओ.टी तत्वावर निविदा प्रसिदध होऊन पुण्यातील एका कंपनीने टेंडर घेतले असुन अणेक महिन्यांपासुन कंपनीकडुन फक्त मोजन्याच चालु असल्याचे दिसत आहे.रस्ते चौपदरीकरणाचा प्रश्न मार्गी लागल्यास दळणवळन वाढुन या मार्गावर होणा.या अपघातांच्या संख्येत मोठी घट होणार आहे.
गत चार वर्षे दुष्काळात होरपळलेला शेतकरी कसाबसा सावरन्याचा प्रयत्न करत असतानाच या भागातील शेतक.यांच्या मानगुटीवर पुन्हा भयावह दूष्काळाचे भुत बसु पहात आहे.शेतीच्या माध्यमातुन अल्पशा पावसाच्या पाण्यावर उदरनिर्वाह करणारा या पटयातील शेतकरी या येत असलेल्या संकटामुळे खुपच भयभित झाला असुन पुढे काय करायचे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासुन उभा आहे.गतवर्षी द्राक्षबागांना छाटनीच्या वेळैस पाणी मिळु शकले नाही त्यामुळे या भागातील जवळपास एैशी टक्के द्राक्ष बागांना यावर्षी मालच लागलेला नाही.उलट शेतकरी या बागा जगवन्यासाठीच कसरत करताना दिसत आहे.शासनाने या परिस्थतीकडे साधे ढुंकुनही बघन्याचे औदार्य दाखवलेले नाही.तरीही शेतकरी असो असे म्हणत बागां टिकवन्यासाठी धडपडत आहेत.
कांदा कधी शेतक-यांच्या चेह-यांवर हासु आनतोय तर कधी ग्राहकाला रडवतोय.कांदाच्या दरातील चढउतार कांदा उत्पादक शेतक.यांच्या जिवावर बेतत आहे. कांदयाच्या दरातील चढउतारामुळे कांही कांदा उत्पादक शेतक-यांनी आत्महत्या केल्याच्या घटना ताज्या आहेत.त्यामुळे अशा घटना टाळन्यासाठी हमीभाव देणे गरजेचे आहे.
पोलिस प्रशासनाच्या दृष्टीने गत वर्षे विविध निवडणुकामुळे तानतनावाचेच गेले आहे.काटेगांव येथिल खुनाची घटणा वगळता गंभिर गुन्हे त्या मानाने कमी घडले. सरत्या वर्षात हदीत कोणती स्फोटक अथवा प्रशासनावर तान आनणारी एकही घटना घडलेली नाही. प्रशासनाने परिस्थती हाताळत शांतता ठेवन्याचे काम केले आहे.एकंदर सरते वर्षे हे सर्वसामान्यांसह शेतकरी कष्ठकरी यांच्यासाठी कांही अपवादात्मक गोष्ठी वगळता त्रासदायकच गेले असुन आगामी वर्षे तरी कसे सुरू होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.