पांगरी (गणेश गोडसे) :- सध्याच्या स्पर्धेच्या युगात सर्वसामान्य गरीब,होतकरू विद्यार्थिही टिकने गरजेचे असून विद्यार्थ्यांना त्या सुविधा मिळाव्यात असे प्रतिपादन पांगरीचे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.अरुण नारकर यांनी केले. ते पांगरी (ता.बार्शी) येथिल जिल्हा परिषद मुलांच्या तिन्ही प्रशाळेतील विद्यार्थ्यांना आमदार दिलीप सोपल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत वह्या वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हा प्रशाळेतील 400 विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत वह्या वाटप करण्यात आले.यावेळी पांगरीचे सरपंच युन्नुस बागवान,उपसरपंच रामभाऊ गाढवे,ग्रांमपंचायत सदस्य अंकुश लाडे,नीलकंठ शेळके,मोरे मेजर,स्वप्नील काळे,माजी सरपंच दत्ता काकडे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास गोडसे,धनंजय तौर,विक्रांत गरड,बाबा जाधव,सादिक पठाण,प्रल्हाद गाढवे,बालाजी पवार,दिपक शेळके,मुख्याध्यापक लक्ष्मण काशीद,नवनाथ मुंढे,शिंदे गुरुजी,जनाब खान यांच्यासह ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते.
 
Top