पांगरी (गणेश गोडसे) :- विद्यानिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळा येरमाळा व गट शिक्षण कार्यालय पंचायत समिती कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने येरमाळा (ता. कळंब) 2015-16 चे दि.18 डिसेंबर रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विद्यानिकेतन प्रशाळेचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी प्रसिध्‍दी पत्रकाद्वारे दिली.
         विद्यानिकेतन प्रशाळेत होणार्‍या तालुकस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन माजी मंत्री व आ.राणा जगजितसिह पाटील यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळंब पंचायत समितीच्या सभापती सौ.जयश्रीताई कांबळे असणार असून यावेळी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ.लताबाई पवार,उपसभापति विश्वनाथ तांदळे,पंचायत समितीच्या सदस्या सौ.छायाताई वाघमारे,येरमाळ्याचे सरपंच विकास बारकूल,नवोदय विद्यालय तुळजापूरचे प्राचार्य व वैज्ञांनिक मार्गदर्शक विजयकुमार बोस,प्रशाळेच्या संस्थापिका श्रीमती प्रभावती पाटील आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
  तरी या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन कळंबचे गटविकास अधिकारी श्रीमती शांता सुरेवाड,गटशिक्षणाधिकारी चंद्र्कांत गावडे,सचिन पाटील यांनी केले आहे.

 
Top