मुंबई -: पगारवाढीच्या मागणीसाठी संपावर गेलेल्या एसटी कर्मचार्यांच्या इंटक संघटनेनं अखेर संप मागे घेतला आहे.
परिवहन मंत्री ना. दिवाकर रावतेशी ‘इंटक’सोबत झालेल्या बैठकीत या संपावर तोडगा निघाला आहे. दिवाकर रावते यांच्या आश्वासनानंतर इंटक संघटनेनं आपला संप मागे घेत कामावर रूज होण्यास सुरुवात केली आहे.. डेपोतून बसेस सुटण्यास सुरू झाल्यामुळे प्रवाशांचा जीव भांड्यात पडलाय.
कमी पगारामुळे एका कर्मचार्याने आत्महत्या केल्यामुळे इंटक संघटनेनं पगारवाढीसाठी संप पुकारला होता. कर्मचार्यांनी आक्रमक पवित्रा घेत डेपोतून बसेस बाहेर पडू दिली नाही. एवढंच नाहीतर डेपोत बसेसची हवाच सोडण्यात आली. त्यामुळे बसेस जागेवरच उभा राहिल्या. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या संपामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल झाले. अखेर आज परिवहन मंत्री दिवाकर रावतेंसोबत झालेल्या बैठकीनंतर संप मागे घेण्यात आला.