पांगरी (गणेश गोडसे) :- विरोधात भाषण केल्याचा राग मनात धरून चौघांनी मिळून एकास गाठून लोखंडी गज,काठी व लोखंडी पाईपने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना महागांव-पिंपळगांव चौकात घडली.
दिगंबर शिवाजी काशिद (वय 40 रा.महागांव ता.बार्शी) असे लोखंडी गजाच्या हल्ल्यात जखमी झालेल्याचे नांव असून अंकुश श्रीपती मोरे,अमोल अंकुश मोरे,संतोष फुलचंद घोलप,फुलचंद नागनाथ घोलप चौघेही रा.महागांव अशी मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्याची नांवे आहेत.
जखमी दिगंबर काशिद यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,ते महागांव-पिंपळगाव चौकात एस टी बसची वाट बघत बसले असता आरोपीं एम.एच 13 0827 व एम.एच.13 ए .एच.5019 या दुचाकीवरून चौकात आले.आरोपी अंकुश मोरे याने तू माझ्या विरोधात भाषण का केले असे म्हणत शिवीगाळी केली.अमोल अंकुश मोरे याने त्याच्या हातातील लोखंडी गजाने फिर्यादिस डाव्या हातावर मारहाण करून जखमी केले.संतोष घोलप याने काठीने डाव्या हातावर मारहाण करून जखमी केले.तसेच अंकुश मोरेयाने लोखंडी पाइप पाठीवर,पायावर मारहाण करून जखमी केले.फुलचंद घोलप याने हातावर मारहाण केली.तसेच आमच्या नाडी लागलास तर आमच्याकडे बंदूक आहे सोडणार नाही असे म्हणून धमकीही दिली आहे.उबाळे यांच्या फिर्यादीवरून चार जनावर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.