उस्मानाबाद :- जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या अध्येक्षतेखाली प्रकल्प प्रेरणा कार्यशाळा जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रूग्णालय उस्मानाबाद येथे संपन्न झाली.
          या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी़ डॉ. प्रशांत नारनवरे उस्मानाबाद यांनी असे सांगीतले केले की, सध्या दुष्काळी परिस्थिती असून ग्रामिण भागातील शेतकरी व शेतमजुर अडचणीत आहेत. जनावरांसाठी चारा छावण्या सुरु असून सध्या पाणी टंचाईच्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. सुरु असलेल्या चारा छावण्यांच्या ठिकाणी शेतकऱ्यांचे आरोग्य तपासणी व समुपदेशन आरोग्य कर्मचारी व आशा यांचे मार्फत करण्यात यावे व टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाण्यामध्ये टी.सी.एल. पावडरच्या नियमित वापर करावा ज्यामुळे जलजन्य आजार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
          तसेच जिल्हयातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण / उपजिल्हा रुग्णालय येथे प्रत्येक बुधवारी तज्ञ डॉक्टरामार्फत मोफत आरोग्य तपासणीशिबीरांचे आयोजन करण्यात आले असून तपासणी शिबीरामध्ये तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. त्या प्रमाणे मातृत्व संवर्धन दिन महिन्याच्या 2 व 16 तारखेस साजरा करण्यात  येत आहे. त्यामध्ये नाविन्यपुर्ण उपक्रम म्हणून आरोग्यासाठी योगा शिबीर, सासू-सुन मेळावा, हळदी-कुंकू कर्यक्रम, प्रसुतीपुर्व व प्रसुती पश्चात घ्यावयाची काळजी, बाळाचे संगोपन, गरोदर माता व बाळ यांनी घ्यावयाचे पुरक आहार या बाबत मातृत्व संवर्धन दिनी माहिती देण्यात यावी,या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषेद, उस्मानाबाद चे सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य, सरपंच, पत्रकार, खाजगी संस्थाचे प्रतिनिधी, खाजगी वैद्यकीय व्यवसायीक, आशा, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, यांचा सहभाग घेण्यात यावा अशा सुचना जिल्हाधिकारी,डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिल्या.
        जिल्हयातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण / उपजिल्हा रुग्णालया मध्ये तज्ञ डॉक्टरां मार्फत मोफत तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया प्रतेक बुधवारी करण्यात येणार आहेत. 
         तरी शहरी व ग्रामीण भागातील जनतेने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, यांनी केले आहे. त्याचप्रमाणे माहे नोव्हेंबर 2015 अखेर निर्शेशांकडून गुणानुक्रमे निवड झालेल्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खराडे,डॉ.पोतरे,वैद्यकी अधिक्षक डॉ. वाळके यांचा सत्कार जिल्हाधिकारी यांचे हस्ते करण्यात आला.
        या कार्यशाळेस सहा.संचालक (हिवताप लातूर मंडळ ) डॉ. आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. आर.बी. पवार,जिल्हा शल्यचिकिस्तक-डॉ एकनाथ माले, वैद्यकिय अधिक्षक स्त्री रुग्णालय डॉ.आर.पी. वाघमारे, सहा. जि.आ.अ. डॉ. एस.एस.फुलारी,  अति. जि. आ. अ. डॉ. एम. आर. पांचाळ, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ.के.के.मिटकरी, जिल्हा हिवताप अधिकारी-श्री. एन.बोरकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. गामसाळे,तसेच उपजिल्हा / ग्रामीण रुग्णलयाचे वैद्यकिय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.   ****


 
Top