उस्मानाबाद -: जिल्हयातील आजी सैनिक /माजी सैनिक/विधवांच्या पाल्यांना कळविण्यात येते की,आर्मी सप्लाई क्राप्स सेंटर ,बेगळूर येथे दि.28 डिसेंबर,2015 पासून युनिट हेडक्वार्टर कोटा सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.तरी उस्मानाबाद जिल्हयातील आजी सैनिक/माजी/सैनिक / विधवांच्या इच्छूक पाल्यांनी/भावांनी दि.28डिसेंबर,2015 रोजी सकाळी 6.30 वाजता आर्मी सप्लाई क्राप्स सेंटर बेगळूर येथे भरतीसाठी उपस्थित रहावे व सोबत शैक्षणिक प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र, जातीचा दाखला, चारित्र्याचा दाखला व या सर्व कागदपत्रे सोबत घेऊन जावे असे,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मेजर (नि) सुभाष सासने,उस्मानाबाद यांनी कळविले आहे.