नळदुर्ग :- येथील नगरपालिकेचे कार्यालयीन अधिक्षकांनी सामाजिक कार्यकर्त्यास जिवे मारण्याची धमकी देण्यास प्रवर्त करणा-या नगरसेवकावर कारवाई करण्याची मागणी उस्मानाबाद जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे मंगळवार रोजी सामाजिक कार्यकर्ते मारूती खारवे यांनी तक्रारी अर्जाद्वारे केले आहे.

   निवेदनात पुढे म्हटले आहे की, मारूती खारवे यांना दि. 23 मार्च रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास 9665106448 या क्रमांकावरून 9860512058 या माझ्या मोबाईलवर दिपक लिंबाजी कांबळे यांना फोन आला व त्यांनी मला फोनवर आर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे माझ्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. दिपक कांबळे हे न.प. नळदुर्ग येथे कार्यालयीन अधिक्षक म्हणून काम करतात. मी रमाई आवास योजना व्यवस्थित राबवली जात नाही म्हणून मी दि. 15 मार्च रोजी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना भेटून लेखी तक्रार दिली. त्यामध्ये अनेकजण अडचणीत येतात म्हणून दिपक कांबळे यांना पुढे करून मला धमकी देण्यात आली. दिपक कांबळे फोनवर धमकी देताना म्हणतात की, मला नगरसेवकांनी सांगितले आहे. म्हणजेच जे लोक अडचणीत येतात त्यांच्याकडून माझ्या जिवीतास धोका निर्माण झालेला आहे. मला व माझ्या कुटुबांच्या जिवीतास बरे वाईट झाले तर दिपक कांबळेसह त्यांना सांगणा-या नगरसेवकास जबाबदार धारण्यात यावे, असेही खारवे यांनी निवदेनात नमूद केले आहे. 
 
Top