नळदुर्ग बेघरांच्या पुनर्वसनाबाबत नगरसेवक सचिन डुकरेंच्या उपोषणाबाबत प्रतिक्रिया
----------------------------------------------------------------------------------------------------

अतिक्रमणाच्या नावाखाली सर्व्हे नं. 29 मधील राखीव जागे व्यतिरकित्‍ गोरगरीबांची घरे पाडण्यात आली. त्या बेघर कुटूंबियांसाठी सर्व्हे नं. 29 मधील आरक्षण जागा सोडून उर्वरित जागेत या लोकांचे पुनर्वसन करण्यात यावे, यासाठी आपण नगरपालिकेसमोर बेमुदत आमरण उपोषण करीत आहात. या उपोषणास आम्ही शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या लढयाला जाहीर पाठिंबा देत आहोत...
- ज्योतिबा येडगे, मनसे नळदुर्ग शहराध्यक्ष

नळदुर्ग येथील सर्व्हे नं. 29 मधील बंजारा (लमाण) कुटूंबियांची पन्नास वर्षापूर्वीची राहत घरे न.प. प्रशासनाने पाडले. त्यामुळे या समाजावर मोठा अन्याय झाला. ही घटना घडून चार महिन्यापेक्षा अधिक काळ उलटला. मात्र याप्रकरणी अनेक संघटनानी प्रशासनाकडे तक्रार करुनही पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सचिन डुकरे यांनी दि. 3 मे पासून नगरपालिकेसमोर बेघरांचे पुनर्वसन करावे या प्रमुख मागणीसाठी आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांना भोई समाज क्रांती दल उस्मानाबाद जिल्हा शाखेचा जाहीर पाठिंबा.
- विशाल डुकरे,
 जिल्हाध्यक्ष भोई समाज क्रांती दल

नळदुर्ग येथे झालेल्या अतिक्रमणग्रस्तावर जी कारवाई झाली ते अन्यायकारक असून त्याचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने निषेध करतो. सचिन डुकरे हे आमरण उपोषण करत आहेत त्यास पूर्णपणे पाठिंबा देतो आणि शासन दरबारी अपिल करतो की, लवकरात लवकर अतिक्रमणग्रस्तांचे पुनर्वसन करावे, हि विनंती..
बशिर शेख (मनसे परिवहन जिल्हा उपाध्यक्ष)

मनाने आणि तनाने मेलेल्या या नगरपरिषदेसमोर उपोषणास बसलेल्या सचिन डुकरे यांना माझा पुर्णपणे पाठिंबा देत आहे. बेघरांना घरे हे मिळालेच पाहिजे. आपला लढा हा सुरुच ठेवा, ईश्वर आपल्याला शक्ती देवो  आणि या न.प. प्रशासनाला बुध्दी देवो, हिच प्रार्थना…
- विनायक अहंकारी, सामाजिक कार्यकर्ता

सर्व्हे नं. 29 मधील बेघर झालेल्या कुटूंबाचे पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेले न.प. सदस्य सचिन डुकरे यांना जाहिर पाठिंबा…
- पदमाकर घोडके,
भाजपा नळदुर्ग शहराध्यक्ष

नळदुर्ग येथे झालेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत गोरगरीबांची घरे पाडण्यात आली. त्यात खुप अन्यायकारक पध्दतीने जुलमी राजवटीसारखी परिस्थिती निर्माण झाली. त्या विरोधात व पुनर्वसन करण्यासंदर्भात सचिन डुकरे यांनी जे आंदोलन सुरु केले आहे. त्यांना सोशालिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने जाहीर पाठिंबा देत आहोत...
- बळीराम जेठे,
सामाजिक कार्यकर्ते

बेघर कुटूंबियांचे पुनर्वसन झाले पाहिजे. मा. सचिनजी डुकरे यांच्या लढयास माझा पाठिंबा आहे…
- प्रमोद कुलकर्णी,
मनसे शहर सचिव

नळदुर्ग शहरातील लमाण (बंजारा) व दलित, मुस्लिम या समाजाची घरे नळदुर्ग नगरपरिषदेने बेकायदेशीररित्या काढून लमाण वस्ती उध्दवस्त केली. ही वस्ती गेली पन्नास वर्षापासून घर करुन वास्तव्यास होती. त्या काळी नगरपरिषद सुध्दा अस्तित्वात नव्हती. तेंव्हा हि वस्ती वर्षानुवर्षे येथे राहत होती. अशा गोरगरीब बंजारा समाजाच्या लोकांना न्याय मिळावे, याकरीता उपोषणास बसलेले नगरसेवक सचिन किसनराव डुकरे यांना युवासेना तालुका अधिकारी ज्ञानेश्वर नारायण घोडके यांचा जाहीर पाठिंबा  आहे.
- ज्ञानेश्वर घोडके,
युवासेना तुळजापूर तालुकाप्रमुख

बेघर गरीब कुटूंबियांना आता घरे नसल्याने येणा-या पावसाळयात त्यांना जीवन जगणे कठीण आहे. त्यामुळे त्यांना त्वरित घरे मिळणे गरजेचे आहे. त्यांचे पुनर्वसन होणेबाबत नगरसेवक सचिन डुकरे यांनी सुरु केलेल्या उपोषणास आमचा पाठिंबा आहे.
- पत्रकार विलास येडगे व तानाजी जाधव

बंजारा, दलित व मुस्लिम समाजाला बेघर केले गेले आहेत. या लोकांना न्याय दयावा, त्या ठिकाणी पुनर्वसन करुन दयावे ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नळदुर्ग शहर शाखा व अल्पसंख्यांक मुस्लिम आघाडीच्यावतीने जाहीर पाठिंबा देत आहेत.
- बाबासाहेब बनसोडे (रिपाइं शहराध्यक्ष)
 बाशिद कुरेशी (अल्पसंख्यांक मुस्लिम आघाडी तालुकाध्यक्ष)

आज रोजी दि. 3/5/16 नगरपरिषद जवळ उपोषणास बसणारे नगरसेवक सचिन डुकरे व इतर बेघर लोकांना सर्व्हे नं. 29 मधील आरक्षण क्रं. 49 व 50 सोडून राहिलेली एकूण 35 एकर पैकी उर्वरित जमीनीवर पुनर्वसन करणे योग्य राहिल.
- दत्तात्रय दासकर,
 माजी नगराध्यक्ष

मला असे वाटते की, सर्व बेघर माणसांना त्यांच्या हक्काचे घरे लवकरात लवकर दयावे. पाच महिने होत आहेत, लहान मुले, महिला-पुरुष सर्व भटकत आहेत. उपासीपोटी जिवन जगत आहेत. हाताला काम नाही, दुष्काळी परिस्थिती आहे. स्वयंपाकला चूल नाही, काय करायच कळत नाही, तरी त्यांच्या रास्त मागण्या आहेत. शासनाने लवकरात लवकर मान्य करुन त्यांना होणा-या त्रासाची जान ठेवावी...
- शाहेदाबी सय्यद,
 सामाजिक कार्यकर्त्या

गोरगरीब जनतेला बेघर करुन रस्त्यावर संसार आले. त्या जनतेसाठी तन्मयतेने बहि-या झालेल्या सरकार विरोधात उपोषणास बसलेल्या व जनतेसाठी धडपडणा-या सचिन डुकरे यांना माझा व माझ्या कुटूंबाचा पाठिंबा आहे...
- प्रा.डॉ. महेश विजयकुमार मोटे,
सदस्य धर्मवीर संभाजी तरुण मंडळ नळदुर्ग

सर्व्हे नं. 29 मधील बंजारा समाजाचे काढलेली घरे त्यांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. पुनर्वसनासाठी नगरसेवक सचिन डुकरे यांचे आमरण उपोषण करुन बंजारा समाजास न्याय मिळवून देण्याची त्यांची रास्त मागणी आहे...
- सुनिल बनसोडे,
उस्मानाबाद जिल्हाप्रतिनिधी मी मराठी

दि. 27,28,29 डिसेंबर रोजी नगरपरिषदेच्या प्रशासनाने अतिक्रमणाच्या नावाखाली सर्व्हे नं. 29 व इतर ठिकाणी ज्या लोकांना बेघर केले आहे. अशा सर्व लोकांना आरक्षित शासकीय जमीन सोडून राहिलेल्या जागेवर त्वरित त्यांचा पुनर्वसन करावे. मा. सचिन डुकरे यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणास आमचा पाठिंबा आहे.
- शहबाज काझी (नगसेवक),
 नय्यरपाशा जहागिरदार (राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता)
शब्बीर सावकार (नगरसेवक)

दि. 3/5/16 रोजी दुपारी 3 वाजून 38 मिनिटानी श्री सचिन डुकरे यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झाले असता मुख्याधिका-यांचे कलेक्टर (जिल्हाधिकारी स्तरावर) कारवाई चालू असल्याचे मुख्याधिका-याचे मत आहे. सभागृहात मी स्वत: नगरसेविका असून सभागृहामध्ये कलेक्टरच्या कारवाईबाबत संबंधित कारवाई बददल कुठलीही माहिती देण्यात आली नाही किंवा या विषयावर बैठक बोलविण्यात आली नाही. तेंव्हा मुख्याधिका-याकडून जनतेची व उपोषणकर्त्यांची दिशाभूल होत असल्याचे दिसते. तरी याबाबत तात्काळ चौकशी करुन घरे देण्याची तारीख निश्चित करावी, काहीच खुलासा न मिळाल्यस तीन दिवसाने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- सौ. निर्मलाताई गायकवाड,
माजी नगराध्यक्षा तथा विदयमान नगरसेविका

सचिन डुकरे सरांनी जे उपोषण सुरु केले आहे, जो गरिबांसाठी आवाज उठवत आहे. सर्व्हे नं. 29 मधील जो बंजारा व मागासवर्गीय समाज राहत होता. त्या समाजावर न.प. ने खूप अन्याय केला आहे. सर्व समाजाला उघडयावर टाकले. त्यांना ऊन, पाऊस या समस्याला तोंड दयावे लागत आहे. गरीब लोकांना आर्थिक, मानिसक जो त्रास झाला, त्यांना बेघर केले. त्या अन्यायाविरोधात मा. सचिन डुकरे यांनी जो बेमुदत उपोषण करत आहे, त्या उपोषणास माझा पाठिंबा आहे. त्या सर्व लोकांना प्रशासनाने जागा उपलब्ध करुन त्यांना स्थायिक करावे व पुनर्वसन करावे.
- अजयकुमार बागडे,
शहराध्यक्ष काँग्रेस अनसुचित जाती-जमाती विभाग

दि. 3 मे पासून नगरसेवक सचिन डुकरे यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. त्यानिमित्ताने गावातील अतिक्रमणे हटवण्याच्या मोहिमेतील त्रासलेल्या बंजारा समाज व तसेच अनुसुचित जाती जमातील काही वर्ग यांना न.प. नळदुर्ग यांनी सुचना न देता पन्नास वर्षापासून वास्तव्यास असलेले लोक, त्यांच्याकडे असलेले कबाले व तसेच लाईट बील, घर पावती (तावण) व तसेच 1985 पूर्वीच्या तावण पावत्या भरलेल्या असतानाही नळदुर्ग न.प. ने त्यांना डोळयादेखत बेघर केले. हि सर्व कार्यवाही उपस्थित सर्व समाजाला विचारात न घेता व त्यांना कसल्याही प्रकारची कायदेशीर सुचना न देता अतिक्रमणाच्या नावाखाली बेघर करण्यात आले. संबंधित संपूर्ण कार्यवाही चुकीची असून त्यास आम्हा लोकास हे मान्य नसून लोकप्रतिनिधी सचिन डुकरे यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देत आहोत...
- ॲड. अभिजित बनसोडे,
सुशिल पाटील,
 निरज डुकरे

दि. 4/5/16 रोजी नगरसेवक सचिन डुकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांची गोरगरीब जनतेच्या पुनर्वसनासाठी जे आमरण उपोषण चालू केले आहे. त्यांना न्याय मिळावा, हे त्यांचे विचार ऐकून निस्वार्थपणे जाती-पातीचे राजकारण किंवा कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करणा-या समाजसेवकास माझा पाठिंबा आहे.
- हजारे एस.डी.

नगरसेवक सचिन डुकरे यांच्या उपोषणाला बसल्याने मनाला आनंद झाला. त्यांचे कार्य निस्वार्थी असून अतिक्रमणामध्ये विस्थापित झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन व्हावे हि मागणी रास्त आहे. त्यांच्या उपोषणास माझा पाठिंबा आहे.
- शेख इमाम मुनाफ,
 नगरसेवक

दि. 4/5/16 रोजी नळदुर्गचे नगरसेवक सचिन (दादा) डुकरे यांची आमरण उपोषण दरम्यान भेट घेतली. त्यावेळी त्यांची प्रकृती दयनीय होती. त्यांनी जे बेघरांच्या पुनर्वसनासाठी हे आंदोलन सुरू केले आहे. हया आंदोलनाला शिव-बसव-राणा सार्वजनिक जन्मोत्सव समिती व श्री संतसेना नाभिक संघटना, भवानी नगर गणेश मंडळ, स्कारलेट क्रिकेट क्लब यांचा जाहीर पाठिंबा देत आहोत.
- नेताजी महाबोले,
उपाध्यक्ष शिव-बसव-राणा जन्मोत्सव समिती

माझ्या या उपोषणाला पाठिंबा आहे.  सौ. अपर्णा अरविंद बेडगे, नगरसेविका

मी नगराध्यक्ष या नात्याने आपल्या उपोषणाचा गांभिर्याने जिल्हाधिका-यांशी याचा पाठपुरावा करीन...
- सौ. मुनवर सुलताना कुरेशी, नगराध्यक्षा

नगरपालिकेने अतिशय क्रुर पध्दतीने या गोरगरीब लोकांची घरे रात्रीतून नेस्तनाबुत केली. हे करण्यापूर्वी किमान मानवतेचा विचारही केला गेला नाही कि कोणी नोटीस दिली गेली नाही. गत तीस वर्षापासून ही कुटूंब येथे वास्तव्यास होती. आज ही कुटूंबे रस्त्यावर आली असून त्यांना मोठया संकटांना सामोरे जावे लागत आहे. तेंव्हा त्यांचे तात्काळ पुनर्वसन होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे आपण करीत असलेल्या उपोषणास आमचा पाठिंबा आहे…….
- सुशांत भूमकर,

 जिल्हाध्यक्ष भाजपा मिडिया सेल
 
Top