नळदुर्ग :- शहरातील सर्वे नं. 29 मधील बेघर कुटुंबाचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी दि.3 मे पासून राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन डुकरे हे नळदुर्ग नगरपालिका कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या दुस-या दिवशी सायंकाळी सव्वा सहा वाजता तहसिलदार काशीनाथ पाटील यांनी लेखी विनंती पत्र दिल्याने डुकरे यांनी आपले अमरण उपोषण मागे घेतले.
        नळदुर्ग न.प प्रशासनाने शहरातील 63 आरक्षित जागेपैकी केवळ दोनच जागेवरचे अतिक्रमण काढले. मनमानीपणे अतिक्रमण काढून गरीब लोकांची असलेली नागरी वस्तीतील घरे उध्वस्त करून सर्वसामान्य नागरिकावर मोठा अन्याय केला. तर धनदांडग्यांचे अतिक्रमण, अनाधिकृत बांधकाम, कबाल्यावर राहण्यासाठी दिलेल्या घर जागेवर व्यवसायासाठी झालेले अतिक्रमणाला न.प. प्रशासाने अभय दिले. ेही घटना डिसेंबरमध्ये घडली. या अन्यायाबाबत प्रशासनाकडे दाद मागूनही दिरंगाई होत असल्याने व पावसाळयापूर्वी सर्वे नं. 29 मधीर बेघर कुटुंबाचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सचिन डुकरे न.प. कार्यालयासमोर 3 मे पासून अमरण उपोषणास बसले होते. दुस-या दिवशी दि. 4 मे रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता तहसिलदार काशीनाथ पाटील, मुख्याधिकारी एन.के पाटील यांनी लेखी अश्वासन दिल्यामुळे डुकरे यांनी आपले उपोषण मागे घेतले. दरम्यान उपोषणस्थळी जेष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी भेट देवून विचारपूस केली. त्याचबरोबर नगराध्यक्ष मुन्वर सुलताना, नगरसेविका निर्मलाताई गायकवाड, अपर्णाताई बेडगे, नगरसेवक शेख इमाम, ॲड अभिजीत बनसोडे, शहबाज काझी, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक नय्यरपाशा जाहगीरदार, पत्रकार सुनिल बनसोडे, लतिफ शेख, शाहेदाब्बी सय्यद, वृत्तपत्र विक्रेता संजय बेले, राष्ट्र सेवा दलाचे संतोष बुरंगे, गणी बागवान, सुरेश हजारे, अजयकुमार बागडे, अजहर जाहगीरदार, शेखर खद्दे, प्रभाकर घोडके, भाजप अल्पसंख्यांक शहराध्यक्ष एस.के बागवान संजय हजारे, विकास कुलकर्णी, शिव-बसव-राणा चे उपाध्यक्ष नेताजी महाबोले, श्री. संत सेना नाभिक संघटना, भवानी नगर गणेश मंडळ, स्कारलेट क्रिकेट क्लब, भाजपचे तालुकाउपाध्यक्ष सचिन घोडके, भाजपा मिडीया सेल जिल्हाध्यक्ष सुशांत भूमकर यांच्यासह सर्व पक्षीय कार्यकर्ते, विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपला पाठिंबा दिला. 
      दरम्यान जिल्हाधिका-याच्या आदेशाने बुधवार रोजी सर्वे नं. 29 ची मोजणी करण्यात आली. या पथकात  नगर रचनाकर, तहसिलदार काशीनाथ पाटील भूमीअभिलेख कार्यालय व मुरूम, उमरगा, लोहार, तुळजापूसह जिल्ह्यातील अन्य नगरपालिका अभियंता, मंडळ निरीक्षक अमर गांधले, तलाठी तुकाराम कदम आदींनी नळदुर्ग येथील सर्वे नं. 29 चे मोजमाप केले.


 
Top