कवितासागर: कवितेचे पहिले इंटरनॅशनल जर्नल

डॉ. सुनील दादा पाटील यांनी दहा वर्षापूर्वी ‘कवितासागर’ या नावाने मराठी - हिंदी - इंग्रजी भाषेतील कवितांना प्राधान्य देणारे नियतकालिक सुरु केले. जगभरात सर्वाधिक वाचले जाणारे व लाखो वाचकांनी पहिली पसंती दर्शविलेले कवितेचे पहिले इंटरनॅशनल जर्नल ठरले असून कवितासागर या इंटरनॅशनल जर्नलची नोंद आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध विक्रमांची दखल घेणा-या एशिया बुक ऑफ रेकॉर्डस २०१५ मध्ये नोंद घेण्यात आली आहे. डॉ. सुनील दादा पाटील हे मराठी कवितेला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा व सन्मान मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांना समाजातून फार मोठ्या प्रमाणावर पाठबळ मिळत आहे. त्याच बरोबर मागील दहा वर्षातील सर्वोत्तम व आगळावेगळा विक्रम म्हणून राष्ट्रीय स्तरावरील महत्वपूर्ण व वेगळ्या विक्रमांची नोंद ठेवणा-या इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस ने देखील दखल घेतली असून त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस २०१६ मध्ये करण्यात आली आहे. (पृष्ठ क्रमांक १४०) डॉ. सुनील दादा पाटील यांचे काहीसे हटके व आव्हानात्मक कार्य मराठी साहित्य क्षेत्रात विशेष कौतुकास पात्र आहे.
 
Top