नळदुर्ग :- कुणीतरी सांगतो यापेक्षा स्व:ताला वाटते म्हणून स्व:तासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेवून अभ्यासात झोकून दिले पाहिजे, मी खेड्यातून शिकुन पुढे आलो आहे,  असे सांगून यापुढेही सर्वोत्तोपरी आवश्यक मदत आपलं घर प्रकल्पास करण्याचे आश्वासन दिल्लीचे  हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे चीफ जनरल मॅनेजर के. श्रीनिवास यांनी नळदुर्ग येथे दिले.

      हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या वतीने गुरुवार दि. ९ नोव्हेंबर रोजी नळदुर्ग येथिल राष्ट्रसेवा दल संचलित आपलं घर प्रकल्पास  सुमारे साडे चार लाख रुपये खर्चुन दहा संगणक संच व पन्नास टेबल-बाके भेट देण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्रीनिवास हे बोलत होते.याप्रसंगी जेष्ठ समाजवादी  विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा, हिदुंस्थान पेट्रोलियम कंपनीचे सोलापुर चीफ झोनल मॕनेजर बी. रविंद्र, किशोरकुमार नारायणे, ॲड. बसवराज सलगर आदींची उपस्थिती होती.

     यावेळी उपस्थित मान्यवरांचे आपलं घर प्रकल्प व राष्ट्रसेवा दलाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविकात जेष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा यांनी अनाथ व निराधार मुला-मुलींसाठी चालवण्यात येणा-या आपलं घर प्रकल्पाच्या आतापर्यंतच्या वाटचालीबाबत सविस्तर माहिती दिली.

      या कार्यक्रमास राष्ट्रसेवा दलाचे  बळीराम जेठे, विलास वकिल,  मंगला दुरुगकर (औरंगाबाद) दत्ता गायकवाड ,  सोलापूरचे नगरसेवक चेतन नरोटे, नळदुर्ग येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापिका के.एम. सबनीस, उदयोजक श्रीशैल गबुरे, संतोष गबुरे, माधुरी सुरवसे, आपलं घरच्या प्रभारी व्यवस्थापिका विजया बिवलकर, मुख्याध्यापक सुरेश कांबळे, तेजल गॅसचे व्यवस्थापक प्रदीप ओव्हाळ, विजय कुमार धरणे, संजय हजारे आदीजण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगला दुरुगकर यांनी तर आभार दत्ता गायकवाड यांनी मानले. शेवटी राष्ट्र गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
 
Top