नळदुर्ग :  उस्मानाबादचे  जिल्हाधिकारी डाँ. राधाकृष्ण गमे यांनी सपत्निक नळदुर्ग येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यास शनिवार  रोजी दुपारी भेट देवून किल्ल्यातील  ऐतिहासिक वास्तुंची पाहणी केली. युनिटी मल्टिकाँन्स कंपनीचे मुख्य संचालक कफिल मौलवी यांनी डाँ. गमे यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवराचा  सत्कार केला.
       जिल्हाधिकारी डॉ.गमे यांनी सदिच्छा भेट देवून किल्ल्याची पाहणी केली, किल्ल्यातील नऊ बुरूज, पाणी महल धबधबा, बारादरी, उपळी बुरूज, परंडा बुरूज, या वास्तूंची  पाहणी केली, यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह तुळजापुरचे उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तुळजापुरचे नायब तहसिलदार अमित भारती, इतिहास तज्ञ प्रा.डाँ. सतिश कदम, तलाठी तुकाराम कदम, युनिटी  मल्टिकाँन्स कंपनीचे जयधवल शहा, जनसंपर्क आधिकारी अनिल विपत, नगरसेवक शहबाज काझी, दुर्वास बनसोडे, बाबासाहेब बनसोडे, यांच्यासह न.प. कर्मचारी उपस्थित होते.

 
Top