नळदुर्ग : राज्य मार्गावरील नळदुर्ग ते तुळजापूर रस्त्यावरील चिवरीपाटी जवळ एका महीलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली असून अपघात की घातपाताने मृत्यू झाला याचा तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत. दरम्यान याप्रकरणी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नळदुर्ग येथील बबिता तुकाराम शिंदे (वय ३६ ) असे मृत महिलेचे नाव असल्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक संजीव मिरकले यानी सांगुन जळकोट ता.तुळजापुर येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आल्याचे सांगितले.