तुळजापूर :- कर्नाटक राज्यातील भावसार समाजबांधवानी शुक्रवार रोजी गुरुपौर्णिमे दिवशी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. बागलकोट येथील भावसार समाज ५० वर्षांपासून गुरुपौर्णिमा तुळजाभवानीच्या दरबारात साजरी करीत आहेत.
गुरू पौर्णिमेनिमित्त कर्नाटकातील बागलकोट येथील एक हजार भावसार समाजबांधवांनी पौर्णिमेदिनी तुळजापुरात कुलस्वामिनीच्या दरबारात हजेरी लावली. कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेची अभिषेक पूजा करून आशीर्वाद घेतले. यावेळी पारंपरिक पुजारी मोहनराव देविदास भोसले व चंद्रकांत गणपतराव पवार यांनी या भावसार समाज बांधवाची कुलधर्म कुलाचार पूजा केली.