नळदुर्ग :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग शहरातील मल्लिकार्जून मंदीर सभागृहात शुक्रवार रोजी शिवसेनेच्यावतीने आयोजित रक्तदान शिबीरात 36 दात्यांनी आपले रक्तदान केले. 
छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालय सोलापूर येथील रक्तपेढीने नळदुर्ग येथे रक्त संकलन केले. यावेळी रक्तदान केलेल्या सर्व युवकांना कै. संतोष हांडे यांच्या स्मरणार्थ अनिल हांडे यांच्यावतीने भेटवस्तू देण्यात आले. शिबीर यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, माजी तालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, शहर प्रमुख  संतोष पुदाले, ज्ञानेश्‍वर घोडके, श्याम कनगर, सोमनाथ म्हेञे,  राजेंद्र जाधव (मेजर), नेताजी महाबोले, सुर्यकांत घोडके, खंडू माने, प्रविण चव्हाण, चंदू शंकरशेट्टी, विशाल कलशेट्टी यांच्यासह शिवसैनिकांनी पुढाकार घेतले. तसेच सोलापूर येथील छञपती शिवाजी महाराज शासकीय रूग्णालयातील डॉ. महेश केसाळे, डॉ. प्रकाश खरात, डॉ. संगिता मोहिते, डॉ. नागेश महामुनी यांच्यासह कर्मचारी विनायक कुलकर्णी, स्वप्नील ठाकरे, सौ. रुपांजली माशाळकर आदींनी रक्त संकलनात मदत केली.
या दात्यांनी केले रक्तदान :- 
सत्यजित कांबळे, सुरज कसेकर, संतोष पुदाले, मंदार पुदाले, समाधान जाधव, अजय दासकर, सोमनाथ म्हेत्रे, सुनिल गव्हाणे, ज्ञानेश्वर दुधबे, मंजुर इनामदार, शिवराज गाडेकर, संदीप बेडके, रविकिरण महाबोले, संभाजी कटके, सौ. संजिना कटके, विशाल नारायणकर, सुरज राठोड, भिकाजी जाधव, उमेश मिचळ, गिरीधर गव्हाणे, गणेश मोरडे, नेताजी महाबोले, रवि पिस्के, नितिश कौरव यांच्यासह 36 जणांनी रक्तदान केले.

 
Top