कळंब : महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शिराढोण (ता. कळंब) येथील
शाखेकडून शेतक-यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ होत असून संतप्त शेतक-यांनी याचा
निषेध म्हणून मंगळवार दि. 10 जुलै रोजी शिराढोण शाखेच्या बँकेसमोर भजन, किर्तन
केले.
सध्या खरीप हंगामातील पेरणीचे दिवस सुरू असून शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी पैशाची चणचण असल्यामुळे केवळ बँकेकडून मिळणाऱ्या पीककर्जावर शेतकरी अवलंबून आहेत. यामुळे शेतकरी बँकेत पीककर्जासाठी चकरा मारत आहे. मात्र शिराढोण येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेच्यावतीने कळंब तालुक्यातील शिराढोण, रांजणी, वाकडी, सौंदना, ताडगाव येथील शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ होत आहे शेतकऱ्यांनी याचा निषेध म्हणून बँकेसमोर कीर्तन, भजन केले. शेतकऱ्यांना शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे सरसकट पीक कर्जाचे शेतकऱ्यांना वाटप करावे, अशी या गावांतील शेतकऱ्यांची मागणी आहे.