मुंबई
: जिओ गिगाफायबर सेवेसाठी 15 ऑगस्टपासून नोंदणी सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये देशाच्या 15 ते 20 मोठ्या शहरांमध्ये या सेवेची सुरूवात होईल. सुरूवातीचे 3 ते 6 महिने ग्राहकांना जिओ गीगा फायबरची सेवा मोफत असण्याची शक्यता
आहे. या सेवेसाठी 500 ते 700 रुपयाचा प्लॅन असू शकतो. या प्लॅनमध्ये 100 mbps हायस्पीडसह 100 GB पर्यंत डेटा मिळणार असून सर्वाधिक नोंदणी ज्या शहरांमध्ये होईल त्याच शहरांमध्ये ही सेवा सर्वप्रथम सुरू करण्यात येणार आहे.