तुळजापूर
:- स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दुधाला प्रती लिटर 5 रुपये अनुदान देण्यात यावे
या मागणीसाठी सोमवारपासुन दुध बंद आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या दुस-या दिवशी मंगळवार
रोजी तुळजापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दुग्धविकास मंत्री ना. महादेव
जानकर यांचा नावाचा फलक गाढवाच्या गळयात घालून निषेध करण्यात आला आहे. यावेळी गाढवाच्या
अंगावर दूध ओतून अनोखे आंदोलन करण्यात आले. सदरील आंदोलन महात्मा फुले चौकात करण्यात
आले. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष दुर्वास भेजने, युवा शाखा शहराध्यक्ष प्रदीप जगदाळे,
विकास मारडे, रोहित चव्हाण, विष्णू गाटे आदीजण उपस्थित होते.