पोलादपूर :-  पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील रायगड जिल्ह्याच्या हद्दीत दाभील टोक येथ एका खासगी बस कोसली असून जवळ पास 30 ते 35 प्रवासी असल्याचे प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे
बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठची बस पोलादपूर महाबळेश्वर येथे जात असताना सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील दाभील टोक येथे आली असता या राज्य मार्गावर असलेल्या धुक्या मुले चालकांना पुढील रस्ता न दिसल्यानी सदरची बस दरीत कोसळून 200 फुट दरीत कोसली आहे
या अपघाताची वृत्त समजताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी ,कशेडी महामार्ग पोलीस  खेड येथील मदत ग्रुप, महाबळेश्वर चे सह्याद्री ट्रेकर सह  शासकीय अधिकरी घटनास्थळी दाखल झाले आहेत रस्त्यावर धुके असल्याने मदत कार्यात अडथळे येत असल्याचे दिसून येत आहे.
सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दापोली येथून सदरची बस निघाली होती पोलादपूर मार्गे महाबळेश्वर येथे जात असताना त्याच्यावर काळाने घाला घातला असल्याचे दिसून येत आहे या घटनेचे वृत्त समजताच रायगडचे पालकमंत्री रविद्र चव्हाण घटना स्थळी रवाना झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 
कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या पोलादपूरजवळील आंबेनळी घाटात एक खासगी बस 200 फूट दरीत कोसळून आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या बसमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे 38 कर्मचारी आणि 2 चालक- वाहक असे एकूण 40 जण होते. महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग सुट्टी आल्याने कर्मचारी महाबळेश्वरला पिकनिकला निघाले होते. यासाठी त्यांनी विद्यापीठाचीच बस भाड्याने घेतली होती. परंतु बस रायगडमधील पोलादपूर घाटात आल्यावर दरीत कोसळली.
अंबेनळी घाटामध्ये धुकं मोठ्या प्रमाणावर असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. बचाव कार्यात अडथळे येत असल्यानेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.  बस अपघाताची माहिती मिळताच सर्व यंत्रणा आणि महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुप कर्मचाऱ्यांच्या बचावासाठी पोलादपूरला रवाना झाले आहेत.

साभार - पुढारी ऑनलाईन
 
Top