नळदुर्ग : वागदरी (ता. तुळजापूर) येथे ग्रामपंचायतीच्यावतीने गावातील सार्वजनिक
ठिकाणी, शाळा, ग्रामपंचायत, रस्त्याच्या दुतर्फा यासह इतर ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात
येत आहे. शुक्रवार रोजी वृक्ष लागवडीचा शुभारंभ सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार यांच्या
हस्ते करण्यात आला. यावेळी उपसरपंच दत्ता सुरवसे, ह.भ.प. राजकुमार पाटील, ग्रा.पं.
सदस्या विदया बिराजदार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नागनाथ पवार, फत्तेसिंग ठाकूर, शंकर
धुमाळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. शासनाने ग्रामपंचायतीस दिलेल्या उद्दिष्टानुसार
वागदरी या गावात फळझाडासह शोभेचे झाडे असे अकराशे झाडे लावण्यात येणार असून याची जोपासना
करण्याचा यावेळी संकल्प करण्यात आला.