औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला आहे. त्या पाठोपाठ मराठवाडयातीलच वैजारपूरचे राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनीही आपला राजीनामा दिला आहे. सदरील राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे ई-मेलद्वार पाठवल्याची माहिती सदरील आमदारांनी पत्रकार परिषदेत दिली.
मराठा आरक्षणाचा अध्यादेश सरकारने काढावा, काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला 50 लाखाची मदत घ्यावी यासह विविध मागण्यांसाठी जाधव यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. 24 तासात अध्यादेश न काढल्यास राजीनामा देण्याचे जाधव यांनी कालच जाहीर केले होते. त्यानुसार आज पत्रकार परिषदेत त्यानी राजीनामा दिला.