गंगाधर भोसले गुरुजी
नळदुर्ग :- देवसिंगा (तुळ) ता. तुळजापूर येथील निवृत्त मुख्याध्यापक गंगाधर विष्णूपंत भोसले गुरुजी यांचे वयाच्या 81 व्या वर्षी वृध्दापकाळाने मंगळवार दि. 24 जुलै रोजी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर देवसिंगा येथे मूळ गावी बुधवार दि 25 जुलै रोजी सकाळी दहा वाजता अंतिम संस्कार करण्यात आले. या अंत्ययात्रेत विविध क्षेत्रातील मान्यवर, त्यांचे माजी विदयार्थी, नातेवाईक, परिचित सहभागी झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. नळदुर्ग येथील पत्रकार श्रीनिवास भोसले यांचे ते वडील होत. भोसले गुरुजी हे विदयार्थीप्रिय होते. याबाबतचा किस्सा परिसरात परिचत आहे. तो असा की, भोसले गुरुजींची दुस-या शाळेत बदली झाल्यानंतर ते ज्या शाळेत जातील, त्याच शाळेत पुर्वीच्या शाळेचे विदयार्थी प्रवेशासाठी मागोमाग यायचे.
      यावेळी माजी कॅबिनेट मंत्री तथा विदयमान आमदार मधुकरराव चव्हाण, माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी यांनी भोसले गुरुजींना श्रध्दांजली वाहिली. बालाघाट महाविदयालयाचे उपाध्यक्ष उल्हास बोरगावकर, ॲड. दिपक आलुरे, नळदुर्ग न.प. तील काँग्रेसचे गटनेते नय्यर जहागिरदार, नगरसेवक शहबाज काझी, माजी उपनगराध्यक्ष शफीभाई शेख, श्री तुळजाभवानी कारखान्याचे संचालक अशोक पाटील, प्रभारी कार्यकारी संचालक विकास भोसले, दिलीप सोमवंशी, प्रा. राजीव कदम, पत्रकार श्रीकांत कदम, पुण्यनगरीचे वसुली प्रतिनिधी दत्ता शिंदे, मच्छिंद्र कदम, बालाजी साळुंखे, पत्रकार सुहास येडगे, भगवंत सुरवसे, जहीर इनामदार, शिवाजी नाईक, उत्तम बनजगोळे, प्रा. पांडुरंग पोळे, गंधोरा येथील इंदिरा गांधी विदयालयाचे  मुख्याध्यापक विजय नवले, जिवन विकास संस्थेचे सचिव व.ग. सुर्यवंशी, दिनेश पडवळ, मालोजी थिट्टे, रविकिरण खुने, शहाजी शिवकर, धनाजी राठोड, राम बनसोडे, सुरेश गायकवाड यांच्यासह परिसरातील शिक्षक मित्र परिवार, नातेवाईक उपस्थित होते.
 
Top