तुळजापूर : परळी (जि. बीड) येथील मराठा क्रांती मोर्चाबाबत निवेदन देण्यासाठी तुळजापुर तहसिलदाराच्या कक्षात युवक कार्यकर्ते गेले असता उपविभागीय अधिकारी यांनी अरेरावाची भाषा बोलून कार्यालयाबाहेर काढल्याप्रकरणी संबंधित अधिका-यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी पोलीस निरीक्षक यांना तुळजापुर येथील सकल मराठा बांधवांनी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, आज शुक्रवार रोजी संबंधित अधिका-यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
     निवेदनात नमुद केले आहे की, तुळजापूर तहसिल कार्यालयात गुरुवार दि. 19 जुलै रोजी परळी येथील मराठा क्रांती र्मोचा संदर्भात निवेदन देण्यास सकल मराठा बांधव गेले असता उपविभागीय अधिकारी यांनी अरेरावीची भाषा वापरुन, अपमानास्पद वागणवुक देत कार्यालयाबाहेर काढले. संतप्त झालेल्या युवकांनी याप्रकरणी संबंधित अधिका-यावर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन तुळजापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांना दिले. या निवेदनावर विजय भोसले, मनोज माडजे, दिनेश बागल, नागनाथ भिसे, मारुती जाधव, रोहन भांजी, विशाल रोचकरी, संदीप गंगणे, शितल अमृतराव यांच्यासह तीस युवकांच्या स्वाक्ष-या आहेत.

 
Top