नळदुर्ग :- सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर इटकळ ता. तुळजापूर शिवारात अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील एकजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार दि. 25 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातील मयत व जखमी हे नळदुर्ग येथील रहिवाशी आहेत.
सोमनाथ देविदास भूमकर (वय 36 वर्षे, रा. नळदुर्ग) असे अपघात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. तर सचिन नागनाथ भूमकर (वय 40 वर्षे, रा. नळदुर्ग) असे गंभीर जखमीचे नाव आहे. यातील दोन्ही युवक मोटारसायकल क्रमांक एमएच 25 एएफ 9192 यावरुन सोलापूरहून नळदुर्ग कडे येत असताना इटकळ येथील भैरवनाथ पोल्ट्रीजवळ महामार्गावरील खड्डे चुकवताना अज्ञात वाहनाने जोराची धडक देवून झालेल्या अपघातात नळदुर्ग येथील सोमनाथ भूमकर हा जागीच ठार झाला. तर गंभीर जखमी झालेल्या सचिन भूमकर यास पुढील उपचारासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना समजताच नळदुर्गहून नगरसेवक विनायक अहंकारी यांच्यासह मित्र परिवारांनी घटनास्थळी धाव घेवून मदतकार्य केले. 
 
Top