तुळजापूर :- गुजनुर येथे रेशन पुरवठ्यात होत असलेल्या गैरप्रकाराबाबत चौकशी करुन रेशन दुकानदारा विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गुजनुर येथील ग्रामस्थ व सरपंच यांनी तुळजापूर येथे तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि तुळजापूर तालुक्यातील गुजनुर येथील स्वस्त धान्य दुकानदार रेशनकार्डधारकांना रेशनिंग वरील माल व्यवस्थित वाटप करत नसल्याचे तसेच माल वाटप करण्या पुर्वी देण्यात येणाऱ्या पावतीवर नोंद वेगळी व माल देताना युनिट प्रमाणे न देता मनमानी करुन माल वाटप करतो तसेच माल वाटप करीत असताना दक्षता समितीच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या न घेता माल वाटप केला जातो त्याबरोबर वंचित लोकांना देण्यात येणारे माल देखील योग्य प्रमाणे वाटप होत नसल्याने पुरवठा अधिकाऱ्यांनी याप्रकरणी प्रत्यक्ष पाहणी करुन रेशनकार्ड धारकांनची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी गुजनुरच्या सरपंच सुवर्णा व्यंकट साळुंखे व उपसरपंच सुनिता सुरज साळुंखे सह ग्रामस्थांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.