मुंबई : उस्मानाबाद जिल्ह्यातील एका महिलेने सावकारी जाचाला कंटाळून मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अलका कारंडे असे या महिलेचे नाव असून, अंगावर रॉकेलं ओतून घेऊन स्वतःला पेटविण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी तीला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
शिरगीरवाडी (ता. परंडा, जि. उस्मानाबाद) येथील अलकाबाई कारंडे ही महिला सावकाराच्या त्रासाला कंटाळली होती. यासंदर्भात त्यांनी सरकारला पत्र लिहून मदत करण्याची विनंती केली. परंतु सरकारकडून कोणतीच दाद न मिळाल्याने त्यांनी अखेर आत्महत्येचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर कारंडे यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे कोणता अनुचित प्रकार घडला नाही.