नागपूर : वैद्यकीय महाविद्यालयाचा अभ्यासक्रम एकच असताना मराठवाड्यातील विद्यार्थांकडे गुणवत्ता असूनही प्रादेशिक अरक्षण धोरणामुळे मराठवाड्यातील होतकरू आणि हुशार विद्यार्थांवर अन्याय होत आहे. त्यांना मुंबई पुणे नागपुर येथिल दर्जेदार महाविद्यालयात प्रवेश मिळू शकत नाही.
हे अन्यायकारक आरक्षण रद्द करून वैद्यकीय प्रवेशाचे समान सुत्र लागू करावे या मागणीसाठी मराठवाडयातील सर्वपक्षीय आमदाराच्यावतीने आज विधिमंडळा समोर आज धरणे आंदोलन करण्यात आले.
मराठवाडयातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या पक्षाच्या सर्व आमदारांनी ७०-३० च्या फॉर्मुल्याविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. इंजिनिअरींग, मेडिकल कॉलेजच्या विदयार्थ्यांना असा रेषो लावला आहे की, मराठवाडा सोडून ज्या काही जागा असतील त्या उर्वरीत भागासाठी विदयार्थ्यांना मिळतील. आता राहिलेल्या ३० टक्के जागा मराठवाडयासाठी मिळणार आहेत असा अन्यायकारक निर्णय भाजप सरकारने घेतला आहे असा आरोप आमदार भांबळे यांनी केला.

 
Top