तुळजापूर :- बारुळ (ता. तुळजापूर) येथील एका तरुण शेतक-याने राहत्या घरास गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवार रोजी पहाटेच्या सुमारास घडली. सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे सदरील शेतक-याने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
     ज्योतालिंग भीमाशंकर मेनकुदळे (वय 38 वर्षे, रा. बारुळ, ता. तुळजापूर) असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे. यातील शेतकरी ज्योतालिंग मेनकुदळे यांची बारुळ शिवारात शेती आहे. त्यांच्या वडिलांच्या नावे बँकेचे 2 लाख 75 हजार रुपये कर्ज असून कर्जाच्या कारणामुळे ते काही दिवसांपासून कामासाठी मुंबईला गेले होते. सततची नापिकी व कर्जामुळे आलेल्या नैराश्यातून मेनकुदळे यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी तुळजापुर पोलीसात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास जे.व्ही. शिंदे हे करीत आहेत. दरम्यान, तलाठी संदीप जगदाळे व कृषी सहाय्यक व्ही.डी. माळी या घटनास्थळाचा पंचनामा केला. 
 
Top