लोहारा (इकबाल मुल्ला) :

सह्याद्रि फाउंडेशन व चाईल्ड लाईन उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिना निमित्त असरा ग्रुप ऑफ स्कुल उर्दु शाळेत 1098 या टोल फ्रि नंबरची जनजागृती व विद्यार्थी गुण गौरव सोहळा घेण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध लेखक सय्यद इफ्तेकार सर होते.यावेळी प्रमुख म्हणुन सह्याद्रि फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ.दापके-देशमुख दिग्गज,इफ्तेकर पटेल सर,अंजुमन हेल्थकेअर वेल्फेअर सो.चे अध्यक्ष फिरोज पल्ला,शाळेचे सह- सचिव हमीद मलिक खान,मुख्याध्यापिका पठाण समिदा फिरदौस,चाईल्ड-लाईन चे अनिल जाधव,अदि उपस्थित होते.

यावेळी सह्याद्रि फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ.दापके-देशमुख दिग्गज यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतलेल्या मुला-मुलींचे कौतुक केले व परिसरातील नागरिकांना *1098* या टोल फ्री नंबरची माहिती देण्याचे आवाहन केले.

यावेळी प्रसिद्ध लेखक सय्यद इफ्तेकार सर* यांनी विद्यार्थ्यांना आपले विचार कोणाचे गुलाम होणार नाहीत याची काळजी घ्यावी असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक हमीद सर यांनी केले तर सुत्रसंचालन सह्याद्री चे गजानन पाटील यांनी केले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक,कर्मचारी,नागरीक तसेच संस्थेचे पदाधिकारी,व कार्यकर्ते,विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top