बार्शी (गणेश गोडसे) : 
बार्शी येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक व प्राध्यापकानी प्राचार्य डॉ. प्रकाश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली श्री भगवंत मंदिर व परिसर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. 
बार्शीतील मंदिर हे भगवंताचे देशातील एकमेव मंदिर आहे. आषाढी वारी निमित्त दर्शनासाठी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. तसेच हे द्वादशी क्षेत्र असल्याने पंढरपूर येथे पांडुरंगाचे दर्शन घेऊन बार्शी येथे भगवंताचे दर्शन घेतल्या नंतर वारी पूर्ण होत असल्याने आषाढी वारी नंतर पुढे आठ दिवस भगवंत मंदिरात भाविकांची गर्दी असते. 
या सोहळ्या नंतर प्रत्येक वर्षी शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मंदिर व परिसराची स्वच्छता करण्यात येते. ही स्वच्छता राष्ट्रीय सेवा योनेचे समन्वयक प्रा.डॉ. गुणवंत सरवदे, प्रा.डॉ.रविंद्र चाटी, प्रा. सोमनाथ यादव यांच्यासह माजी विद्यार्थी सुरज राऊत, रविंद्र बंडे व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवकांनी केली. 

 
Top