बार्शी (गणेश गोडसे) :
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज येथे अग्निशमन मार्गदर्शन व आपात्कालीन व्यवस्थापानाची सुरक्षा कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महाविद्यालयाच्या प्रांगणात शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत रेड अलर्ट फायर सिस्टीम दलाच्या घननीळ दिवटे यांनी प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपात्कालीन व्यवस्थापानाची महत्वाची सूत्रे आणि सुरक्षा व्यवस्थापनाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस के पाटील हे होते. सूत्रसंचालन डॉ. एस डी जामगे सर यांनी तर प्रा. किरण चपटे यांनी आभार मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कॉलेज मधील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.