बार्शी (गणेश गोडसे) :
उंडेगाव ता.बार्शी येथील श्री. शिवछत्रपती सार्वजनिक वाचनालय व संघर्ष लेझीम संघ, यांच्या संयुक्त विद्यमाने रघोजीबुवा ग्रामयात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात ३५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन रक्तदान शिबीराचा शुभारंभ करण्यात आला.सदर रक्तदान शिबीरास जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक विनोद गायकवाड,उंडेगांव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष इंद्रजित यांनी भेट देवून या उपक्रमाचे कौतुक केले. शिबीर यशस्वी करणेसाठी वाचनालयाचे अध्यक्ष सुधाकर जगताप,संघर्ष लेझीम मंडळाचे अध्यक्ष योगेश ताटे, बालाजी जगताप, महेश जगताप, विशाल ठाणेकर, विशाल जगताप, राजेंद्र ताकभाते, ग्रंथपाल गणेश जगताप आदींनी परिश्रम घेतले.