बार्शी (गणेश गोडसे) :
बार्शी येथील दुचाकी चोरीचे सत्र कांही केल्या थांबण्यास तयार नसुन बार्शी तहसिल कार्यालयासमोरून आणखी एक दुचाकी लंपास करण्यात आली आहे.
प्रशांत बबन कलकर्णी (वय 40, रा. बालाजी कॉलनी, बार्शी) यांनी याबाबत बार्शी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, ते बाशी येथील विज वितरण कंपणीच्या कार्यालयात वायरमन म्हणून काम करुन उपजिवीका करतात. जाणेयेणेकरीता त्यांनी 2010 साली MH13 AV3388 ही दुचाकी खरेदी केली होती. ते तहसिल कार्यालय बार्शी येथे वैयक्तिक काम असल्याने गेलो होते. तेव्हा त्यांनी त्यांची मोटार सायकल ही हॅण्डल लॉक करुन तहसिल कार्यालयासमोर उभी करुन ठेवली होती. ते तहसिल कार्यालया मधील काम संपवत मोटार सायकल उभी करुन ठेवलेल्या ठिकाणी आले असता तेथे दुचाकी दिसुन आली नाही. त्यांनी दुचकीचा ईतरत्र शोध घेतला असता मिळून आली नाही. तहसिल कार्यालया समोर लावलेली मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली असल्याची त्यांची खात्री झाली. दुचाकी लंपास करण्यात आल्यामुळे 25 हजाराचे आर्थिक नुकसान झाले आहे. कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास बार्शी पोलिस करत आहेत.