बार्शी (गणेश गोडसे) :
भालगाव ता.बार्शी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ व नवनिर्वाचित पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे हे होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे नुतन चेअरमन रणवीर राऊत, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, कार्यक्रमाचे आयोजक जि.प.सदस्य मदन दराडे, व्हाईस चेअरमन झुंबर जाधव, उपसभापती अविनाश मांजरे, लक्ष्मण बापू संकपाळ, खुशाल मुंढे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य बुबासाहेब घोडके, वासुदेव गायकवाड, आण्णा चोरघडे मार्केट, प्रमोद वाघमोडे, उमेश बारंगुळे यांच्या सह सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी उपसरपंच सचिन सोनवणे, सुनील सानप,चंद्रभान दराडे, पिराजी कराड सर, राजेंद्र कराड, सत्यवान घोळवे, कालीदास पाटील, उमराव दराडे, संदीप घुगे, महेश (महाराज) पाटील, बन्सीलाल दराडे, दत्तात्रय पाटील, अजीत सरवदे, बालाजी दराडे, आमोल सोनवणे, विकास घुगे, चांगदेव घुगे, अजय घोळवे, दत्तात्रय घोळवे यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन मारुती घुगे सर यांनी केले.
जि.प.सदस्य मदन दराडे यांनी मंजुर करून आणलेल्या मुख्यमंत्री पेयजल योजना - ४६ लक्ष,जि.प.शाळा भालगांव कंपाऊंड -१.५ लक्ष,ग्रामपंचायत भालगाव वेस कॉक्रीटीकरण - २.५ लक्ष,गणपती चौक ते हनुमान मंदिर कॉक्रीटीकरण - ४.५ लक्ष,गणपती चौक ते हनुमान मंदिर पेव्हर ब्लॉक - ६ लक्ष,घोळवे गल्ली कॉक्रीटीकरण - ३ लक्ष,हायमास्ट- १.५ लक्ष आदी कामांचा शुभारंभ करण्यात आला.