नळदुर्ग :- पुणे येथील काव्यमित्र संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सौ. हेमलता काटकर यांना कार्यक्षम उदयोजक पुरस्कार जेष्ठ साहित्यिक शिवाजीराव चाळक, प्रसिध्द कवी ईशान संगमनेरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी राज्याच्या कारागृहाचे महासंचालक डॉ. विठ्ठलराव जाधव, सुकम बाफना, तुकाराम मोरे, संस्थेचे अध्यक्ष राजीव सगर आदी मान्यवर उपस्थित होते.
सौ. हेमलता काटकर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रशांत देशमुख, अविनाश मेडके, उमेश कपनुरे, दिनेश देशमुख आदींनी अभिनंदन केले आहे.