नळदुर्ग  :- अणदूर ता. तुळजापूर  येथील श्री श्री गुरुकुल व रविशंकर विद्यामंदिर येथे युगप्रवर्तक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बसवेश्वर निसरगुंडे तर लक्ष्मण नरे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश गायकवाड यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन साक्षी पिसे व स्नेहा मेलगिरी या विद्यार्थिनी केले तर आभार मंजुषा मोरखंडिकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख शिवराज भुजबळ व सर्व शिक्षक बांधवांनी परिश्रम घेतले.
 
Top