बार्शी (गणेश गोडसे) :- रस्त्याच्या कडेने चालत जाणा-या पादचा-यास अज्ञात चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत पादचारी जखमी झाल्याची घटना बार्शी शहरातील कुर्डुवाडी रस्त्यावर घडली.
बिभिषण मारुती वाघमारे वय.47 ,रा. सिद्धार्थ नगर, बार्शी असे जखमीचे नाव आहे.जखमी वाघमारे यांनी बार्शी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, ते मॅकॅनिकल चा व्यावसाय करतात.ते निंबळक या गावी जाणे करीता बाळेश्वर नाक्यावरूण एस.टी.स्टॅन्ड, बार्शी येथे पायी चालत जात असताना ते पंपाजवळील चिंचेच्या झाडाजवळ आले असता पाठीमागुन भरधाव वेगाने आलेल्या चार चाकी वाहनाने त्यांना जोराची धडक दिली.तसेच सदरचा वाहनचालक अपघातानंतर दुखापत करुन वाहनासह फरार झाला आहे.वाहनचालक त्यांना जखमी अवस्थेत जागेवर सोडुन खबर न देता निघून गेला.वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरूद्ध अपघात करूण पळून गेल्याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास बार्शी शहर पोलिस करत आहेत.