लोहारा (इकबाल मुल्ला) :-
          माणसांना होणारा आजार आरोग्य शिबीराच्या माध्यमातुन लवकर लक्षात येतो.त्यामुळे आरोग्य शिबीर राबविणे ही काळाची गरज असुन आरोग्य शिबीर घेणाऱ्या संस्थेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे असे प्रतीपादन भाजपा जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी केले.

          एकता फाऊंडेशन उस्मानाबाद,ग्रामसेवा युवा मंच खेड,रोटरी क्लब व तुळजाभवानी सहकारी रुग्णालय उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यामाने उस्मानाबाद तालुक्यातील खेड येथील सांस्कृतीक सभागृहात मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर घेण्यात आले.या शिबीराचे उदघाटन करुन दत्ताभाऊ कुलकर्णी बोलत होते.या कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन करुन करण्यात आली.
यावेळी प्रमुख म्हणुन धनेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डाँ.प्रतापसिंह पाटील,उस्मानाबाद नगरीचे नगराध्यक्ष नंदुराजे निंबाळकर,शिवसेना तालुकाप्रमुख सतिश सोमाणी,भाजपा शहराध्यक्ष संदीप कोकाटे, तुळजाभवानी सहकारी रुग्णालयाचे अध्यक्ष प्रशांत कुदाळ,तज्ञ संचालक नितीन गरड,एकता फाऊंडेशन चे सचिव आभिलाष लोमटे,संजय गवाड,नामदेव गरड,भानुदास लोमटे,श्रीकृष्ण माने,जगदीश शिंदे, नितीन घुले,अदि उपस्थिती होते.

  यावेळी पुढे बोलताना दत्ता कुलकर्णी म्हणाले कि,आरोग्य शिबीराच्या माध्यमातुन व्यक्तीना लवकर आजाराचे निदान होत असल्यामुळे त्या व्यक्तीना होणारा मानसिक,शारीरिक व आर्थिक ञास कमी होतो असे सांगीतले.यावेळी डाँ.प्रतापसिंह पाटील यांनी ही आपले मनोगत व्यक्त करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.व प्रशांत कुदाळ यांनी सहकारी रुग्णालयाची गरज व आता पर्यत सहकारी रुग्णालयांने केलेल्या कार्याबदल माहिती सांगुन जास्तीत जास्त लोकांनी शेअर्स घ्यावे असे आवाहन यावेळी केले. 

या शिबीरात मुख्याने कान नाक घसा, जनरल सर्जरी,दंतरोग,नेञरोग व सर्व रक्त तपासणी, अशा एकुण 475 रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबीरांमध्ये डाँ.सचिन देशमुख,डाँ.अजित नायगांवकर,डाँ.रणजित कदम,डाँ.प्रेमसागर जाधव, शिवरुद इसाके,शुभम मराठे,अजय जाधव,अदिंनी रुग्णांची तपासणी केली.या कार्यक्रमाचे सुञसंचलन संभाजी कुंभार यांनी केले.

या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामसेवा युवा संघ व लाला युवा मंच खेड चे सर्व पदाधिकारी,आदीनी परिश्रम घेतले.
 
Top