कळंब (भिकाजी जाधव) :-
कळंब तालुक्यातील हसेगाव (के) ग्रामपंचायतीने जिल्ह्यातील पहीली पेपरलेस ग्रामपंचायत होण्याचा बहुमान मिळविला असुन स्वातंत्र्य दिना दिवशी येथील ई पेपर कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराव देशमुख तर उद्घाटक म्हणून पंचायत समितीचे सभापती दत्ता साळुंखे प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी प्रशांत काळे, उपसभापती भगवान ओव्हाळ, अरूण चौधरी, शिवाजी बाराते, पंचायत समितीचे सदस्य आत्मलिंग जटाळ. बी बी सोनवणे, टि जे जाधव, अतुल माने, पी बी वळसे, बी पी जोगदंड, सरपंच विश्वंभर पाटील, ग्रामसेवक विजय लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग व माहिती तंत्रज्ञान संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपले सरकार सेवा केंद्र या नावाने उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत अंतर्गत येणारी 1ते 33 सर्व कागदपत्रे अॉनलाईन करण्यात आली आहेत तसेच ग्रामपंचायत स्तरावरून 19 सेवांचा लाभ मिळणार आहे त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तहसील व जिल्हा स्तरावरून मिळणारी कागदपत्रे आता गावातच उपलब्ध होणार आहेत त्यामुळे ग्रामस्थांची हेळसांड थांबणार आहे अशी माहिती पंचायत समितीचे सभापती दत्ता साळुंखे यांनी दिली.
तसेच कळंब तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत लवकरच पेपरलेस करणार असल्याचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी सांगितले जिल्हा लवकरच पेपरलेस करून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातही जिल्हा अग्रेसर असुन येणाऱ्या काळात पुर्ण जिल्हातील ग्रामपंचायतीना या अभियानात सहभागी करून घेणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराव देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डि के कुलकर्णी यांनी तर सुत्रसंचलन व आभार परमेश्वर पालकर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण पाटील, बबरूवान पांचाळ, महादेव यादव, तात्या धुमाळ, उत्तम यादव, महादेव कारंडे, रविंद्र साबळे, कमलाकर पाटील आदिनी प्रयत्न केले.